best love quotes in marathi

Marathi Kavita means poems which are written in Marathi. It is the most popular form of Marathi literature and includes various types. Marathi people always keen to read Marathi articles.

So only for Marathi people, mix types of unique Marathi Kavita on life, birthday, husband, brother, etc. present here from Marathi Kavita sangrah. Share it on Marathi Whatsapp Status, facebook, twitter with your friends and Loved ones.

कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार :-

कुणीतरी असाव
गालातल्या गालात हसणार
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसाणार.

कुणीतरी असाव
आपल म्हणता येणार
केल पारक जगन
तरी आपल करून घेणार .

पुसणार कोणी असेल तर
डोळे भरण्याला अर्थ आहे .
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
हे मरण देखील व्यर्थ आहे.

अंतरीचे दुख व्यक्त करताना

हृदय माझे भरून आले
जीवनाची व्यथा सांगताना ,
नयनी अश्रू ढळू लागले

 

निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी :-
निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी….
निरोप तुझा घेताना बघते मागे वळूनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरुनी …
निरोप तुझा मिटते मी पापणी
अंधार हि येइ तेव्हा चेहेरा तुझाच होऊनी …
निरोप तुझा घेताना पाउस गातो गाणी
चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाती…

जीवण्याचा वाटेवर चालताना :-
जीवण्याचा वाटेवर चालताना
कधी भेटलास तू …
सोबती चालताना ,
अर्थ जगण्यास शिकवलस तू ….
कधी वाटेल भीती ,
एकटेच होण्याची
मित्र,फक्त मागे वळून पहा …
तुझ्याच पाठी असेन मी .

Marathi Kavita

एकटेच शब्द माझे :-
एकटेच शब्द हे माझे
सोबतीला सूर नाही
डोळ्यांत दाटले अश्रू
पण आसवांचा पूर नाहि
हाचआहे तो किनारा
येथेच झाली होती भेट आमुची

अन् संपली जेथेच कहाणी
तोही पत्थर आज दूर नाहि
तू जिथे असशील तेथे
पौर्णिमेचा चंद्र सदा नांदो
आंधळ्या माझ्या नभाला मात्र
चांदण्यांचा नूर नाहीच
ही मेजवानी चालली
माझाच केला घात त्यांनी
पंगतीला यावे अन बसावे
मी एव्हढा हि काही मजबूर नाहिच

रात्र त्यांची नेहमीच झिंगलेली
पण आत्मे मात्र अस्थिर
शांत आहे झोप माझी
अंतरी काहीच काहूर नाही…..

Kavita In Marathi

स्वप्नपरी :-
आहे एक सुंदर परी ,
माझ्या स्वप्नात बसलेली …
समोर नाहि पण ,नेहमीच
माझ्या हृदयात असलेली ….
तिच्या आठवणीत नेहमी
मन झुरते माझे …
बोलणे झाले नाहि तर ,
मनच लागत नाही कुठे …
अशी कशी मनात
घर करून गेलीस तू …
हृदयात ण विसरणारी ,
सुखद झखम केलीस तू …

तुझाविन जगणे अधरे वाटे :

झुळूक लाजरी येते
अन स्वप्न वेलीवर झुलते ..
सांज सावली येते
अन उगीच धडपड होते ….
देणा चाहूल साजणी
आज भाव मनी हा दाटे…
येशील का तू सांग एकदा
तुझाविन जगणे अधरे वाटे …

Marathi Kavita Download

एकदाच प्रेम केल :-
एकदाच प्रेम केल ..
खूप काही सहन केल आयुष्यात ..
पण कधी रडावस वाटल नाही…
मनात होत खूप काही….
पण कधी बोलावस वाटल नाहिच ..
सर्वांनी प्रेम दिल मला ..
पण कुणावर परम कारावास वाटल नाहिच ..
प्रेम एकदाच केल मी त्यात सुदधा फसलो ..
आणि पुन्हा कधी जगावस वाटल नाही …

काही झाले तरी एकदम मस्त जगायचे :

काही झाले तरी एकदम मस्त जगायचे
काहीहि झाले तरी एकदम मस्तच जगायचे

अडचणी या येताच राहतात
त्या येण्यासाठीच तर असतात
आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जायचे
काही झाल तरी एकदम मस्त जगायचं

अपयश आल म्हणून खचायच नाही
थारा देऊन त्याला बरोबर घ्यायाच नाही
नव्य जोमाने पुन्हा उभे राहायचे
काही झाल तरी एकदम मस्त जगायचे

आजची वेळ गेली तरी हसले पाहिजे
ते पाहून मरणही वाट चुकले पाहिजे
समाधानी मनाने हसून निघायचे
म्हणूनच काही झाल तरी एकदम मस्त जगायचं
काही झाल तरी एकदम मस्त जगायचं .

Marathi Kavita for Girlfriend

खोडी काढाल तर अशी मारेल फाइट :

खोडी काढाल तर
अशी मारेल फाइट
झटक्यात उतरून जाइल
सारी तुमची एट

अंगावर याल तर
असा देइण ठोसा
दूर जाऊन बसाल
रडत धसा धसा

दंड माझे पहा
रोज दुध पितो
अंगात ताकद आहे
मी कोणाला भितो

बजरंगबली माझा भाऊ
आणि भीम माझा काका
सांगून ठेवतो तुम्हाला
वाटेला जाऊ नका माझ्या .

Marathi Kavita for Love

 ग्रेस
मी खरेच दूर निघालो
तू येऊ नकोना माघे
पूस कुठेतरी वाजे
हृदयाचे तुटती धागे

खोल उठे काळाचा गहिवर
जाले सखीची चिता
एक विराणी घेऊन मृत्यू
सदेव फिरतो रिता

ओजालीत स्वर तुझे
अन स्वरात श्वास तुझा
क्षितीजाच्या कठड्यावर
कललेला भास तुझा

ग्लानीत भास माझे
झाले विदद्ध सत्य
आली तुझ्या मुठीतल
हा एवढाच संत

Marathi Kavita Ghar

मराठी मातेला आता शिवा पाहिजे :
अंधार फार झाला
आता दिवा पाहिजे
मराठी जनतेला आता
जीजाऊचा शिवा पाहिजे….
नेते झाले मस्तवाल
पिचली दुबळी जणता
मस्ती त्यांची जिरवायला
आता युवा पाहिजे …
कसे जाहले कणाहीन
अन पैशाचे भक्त
यांच्या डामदौलासाठी आटते
गौरगरिबाचे रक्त…
तर …
संगर्षाची वादळी हवा पाहिजे …
लाचाराच्या फौझेपुढे उभा ठाकणारा
बाणेदार मराठी युवा पाहिजे
म्हणून आता आम्हाला
जीजूचा शिवा पाहिजे …

kavita 9-हि कविता फोरर्वर्ड करा :
हि कविता फोरर्वर्ड करा,नाहीतर पाप येईल ,
रात्री झोपाल्यानतर ,तुमच्या घरात साप येईल !
पाच झनाना फोरर्वर्ड करा,हरवलेली वस्तू सापडेल
नाही केला तर,भूत तुम्हाला कानाखाली मारेल !
दहा झनाना फोरर्वर्ड करा,सोन्याचा हर मिळेल ,
नाहि केला तर,पाठीवर बेसुमार मार मिळेल !
पंचवीस झनाना फोरर्वर्ड करा,नोकरीत प्रमोशण मिळेल ,
नाही केली तर,सकाळ संध्याकाळ लुस मोशन होईल !
शंभर झनाना फोरर्वर्ड करा,लॉटरी मिळून जाइल ,
नाहि केली तर,बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाइल !
पन्नास झनाना फोरर्वर्ड करा,लॉटरी मिळून जाइल ,
नाहि केली तर,बायको तिच्या मित्राबरोबर पळून जाइल !

Kavita 10 – आपले आभाळ :
आपले आभाळ मोजावे आपणच
घेऊ नयेत उसनी कुणाची त्रयस्त निरीक्षणे ..
संदिफातीतून जर विशिष्ट ओळख नसलेले काही
हाताला लागले तर ते आपले आभाळच आसते !

आपले आभाळ जोखावे आपणच
कुण्या दुसर्याने त्यात उड्डाणे भरण्यागोदर …
हात वर केल्यावर जे हातातला लागत नाही
तेही असू शकते आपले आभाळच !

आपले आभाळ निरखावे आपणच
कुण्या दुसर्याने त्यातला सूर्यास्त चीताराण्यापुर्वी …
आपल्या आभाळात आपल्याही नकळत
खुपदा होत असतात सूर्योदय,उल्कापात ,ग्रहणे !

 

kavita 11 – शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात :
शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात
काळत नाहीच ,’काय बघितलं होत कुलकर्णीच्या हेमात ?’
कुल्कार्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोन ,
नाकावरती सोडावाटर आणि मागे दोन वेण्या !
वाऱ आल तर उडून जाईल अशी तिची काय ,
रूप पक्क काकूबाई ..पण अभ्यासावर माया !
ग्यादरिंग मध्ये एकदा गायाल होत तिने गान ,
तेव्हापासून तिच्या घरी वाढल येन जान !
नारळी पौर्णिमेला तीन मला नारळी भात वाढला होता ,
हातात तिच्या राखी बघून मीच पळ काढला होता !
नको त्या वयात प्रेम करण्याची माझी मस्ती झिरून गेली,
शाळेमधली प्रेमकहाणी शालेमाढेच विरून गेली !
थोड्याच दिवसात वेगळ व्यायची वेळ आली होती ,
मित्राकडून कळल ,हेमाच्या वडिलांची बदली झाली होती !
फुलपाखरू दरम्यानच्या काळात बराच पाणी वाहून गेल ,
पुढे हेमाच काय झाल ?हे विचारायचं राहून गेल !
परवाच मला बाजारात अचानक हेमा दिसली,
ओळखलंच नाहीच मी ,म्हटल्यावर खुद्कन गालात हसली !
आईशपथ सांगतो तुम्हाला तिच्यात काय सोलिड बदल झाला होता
चवळीच्या शेंगाला जणू आंब्याचा मोहोर आला होता !
लग्नानंतर पाच वर्षात हेमा गरगरीत भरली होती ,
मागे उभ्या नवर्याने हातात भाजीची पिशवी धरली होती !
सोडवाटर जाऊन आता कॉन्ताकट लेन्स आले होते ,
कडेवर एक आणि हातामध्ये एक असे दोन प्रिन्स झाले होते !
मंगळसूत्र भिरवत म्हणाली, ‘ हे आमचे हे ‘,
“बराच वेळ हात अवघडलाय जरा भाज्या घे “!
म्हणून ,आयुष्यात माणसाने चुकू नये प्रेमात ,
शाळेत असताना मीही एकदा पडलो होतो प्रेमात !!

 

Kavita 12 – जन्म नवा :
रानातुनी नक्षत्राच्या
प्रवास माझा धुंद आसमंत विहंगम
श्वास माझा
शुभ्र सुमने
धुके धुरकट शोधिती
भास माझा
हळूवर मी गोंजारले
ऋतू किती बहरले
जाणते रुतुपर्णी
स्पर्श खास माझा
स्वर्ण रुपेरी जन्म
आरक्त माझा
फिरून गर्भात अवनीच्या
हा प्रवास माझा ….

गारठलेली रात्र :
गारठलेली रात्र
भिजलेली पाउलवाट
दिशाभूल करणाऱ्या धुक्यात
मखमली तुझी साथ
चांदण्यात बुडालेला नदीकाठ
पायात ओली करणारी गार गार लाट
हळुवार चंचल वार्यात
हाताला बिलगणारा तुझा हात
हिरव्या हिरव्या रानात
मंद मंद चांदण्यांचा प्रकाश
बेधुंध करण्यार्या निशिगंधाच्या मोहात
श्वासात दरवळणारा तुझा हात .

 

kavita 13 -फक्त मिठीत घे :
फार काही नको रे तुझ्याकडून
फक्त मिठीत घे …
सगळी दुनिया विरोधात असल्यावर
फक्त मिठीत घे …
जगण्याची इच्छाच असेल गेल्यावर
फक्त मिठीत घे …
मरणाच्या आधी दोन क्षण
फक्त मिठीत घे …
फार काही नको रे तुझ्याकडून
फक्त मिठीत घे …
फक्त मिठीत घे …

 

kavita 14 – बाबा :
चंदना सारखा झिजतो तो, कुटुंबासाठी घाम गाळतो तो ,
स्वकष्टाचे चीज करतो तो, चिमुकल्यांना आसरा मिळावा म्हणून घरटे बांधतो तो |
असेल त्या परीस्थितीत स्वत:ला झोकूनच देतो तो,
उनपाऊसाचा मारा झेलीत संकटांशी हातमिळवणी करतो तो।
माया ममतेचे पाश जरासे दूर ढकलतो ,
आद्य कर्तव्याची कास धरतो ।
घराच्या सुखासाठी स्वत: रोज नव्याने उभा राहतो तो,
दिसत नाही त्याचे संयम ,कष्ट ,शांतता,
सहन शिलतेचा मंत्र सतत तो जपत असतो ।
उच्च अधिकारी होतो तो,
गर्व अहंकार नाही ,अभिमान बाळगतो तो
कल्परुक्षाचे झाड लावतो,पुढील पिढीच्या सुखासाठी आज मात्र झोकून देतो।
याची जाणीव असावी मुलांना असा कष्टकरी बाबा आपला असतो।

Also Visit: Whatsapp Status in Marathi Attitude

 

kavita 15 – मनाचे काय मन हे चंचल :
मनाचे काय मन हे चंचल
हळूवार नाजुक
हा देह सोडू पाहत आहे
मन तुझेच होऊ पाहतेय…!!१!!
मनात भावनांचा हा कल्लोळ
विचारांचे माजलेले काहूर शब्दांची घालमेल
अन नात्यांचा पाऊस
ह्या सर्व त्रासांमध्ये सुटू पहातेय
मन तुझे हे होऊ पाहतेय…!!२!!
मन देऊळतील घंटा घुमटाचा कळस
कधी परसातील तुळस तर पवित्र तीर्थ
सदैव तुझीच फक्त भक्ती करू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय…!!३!!
मन नदीसारखे अवखळ तर नभासारखे विशाल
सागरासारखे खोल तर धरणी सारखे निश्चल
त्याचा हा स्वभाव सोडू पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय…!!४!!
मन सूर्यासारखे प्रखर तर कधी चंद्रासारखे शीतल
नाक्षत्रां सारखे अचल तारकांसारखे दूर
तुझ्या अन फक्त तुझ्याच जवळ येऊ पहातेय
अन मन तुझेच होऊ पाहतेय…!!५!!
मन मना सारखेच गूढ देहा साराखेच नश्वर
मन अत्म्या सारखे तेजपुंज ह्या विश्वाचे अंतरंग
मन अमर होऊ पहातोय
मन पुन्हा तुझेच होऊ पाहतेय…!!६!!
मन हा हिमाचा खंड
मन हा पाण्यावरचा तरंग
मन हे वादळी वारा
मन हे पावसाची धारा
मन तुझ्यावरच बरसू पहातेय
मन फक्त तुझेच होऊ पाहतेय…!!७!!
मन हे हृदयाचा आरसा,
आणि मनाचा वारसा
मन अभेद्य अचल
हिमालया सारखे विशाल!!
माझे मन पण मी नाही
मी अन मन वेगळे आहोतच
मन एक जाणीव तर मी केवळ एक मुक्त आत्मा
हे तुला परत परत ते दाखउ पहातेय
मन तुझेच होऊ पाहतेय…!
मन तुझेच होऊ पाहतेय…!!

 

Vidamban Marathi Kavita :
आता तरी दारूडया दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिशील का?

रामाच्या परी तुझा गळा सुकतो.
अन गुत्त्याच्या रस्त्यावर तू चालतो.
चुळ जरा पाण्यानी भरशीलस का?
दारू नाहि चहा जरा पिवशी का?

आता तरी दारूडया दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिशील का?

पहिल्या धारेची जेंव्हा तू मारतो.
तेव्हा रस्ता सोडून नाल्या मंदी पाय पडतो.
रात्री तरी घरी गुमान येशींल का?
नाला सोडून गादि वर झोपशील का?

आता तरी दारूडया दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिशील का?

दारुने या संसाराची केली होळी.
बायकोच्या नशिबी मोल मजुरी.
मुलांच्या फिया आता भरशील का?
शाळेमंदी त्यांना कधी धाडशील का?

आतातरी दारूडया दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिशील का?

खंब्यानी अशी हि तुझी वाट लावली.
आतड्यामध्ये अल्सरची गाठ फुटली.
दारू सोडून औषध आताच घेणार का?
बायकोच कुंकु राखशील का ?

आतातरी दारूडया दारू सोडशील का?
पानी ज्याला म्हणत्यात ते पिशील का?

बायको होता होता ती मेहुणी झाली !

बायको होता होता ती मेहुणी झाली !
आता पून्हा भविष्यांच्या पेटवा मशाली !

आम्ही नेमकी तिचीच आस धरावी का ?
जे कधीच नव्हते त्याची वाट पहावी का ?
कसा सोनेरी शब्दांच्या वाहतो पखाली !

तेच घाव करिते पुन्हा फिरुनी ह्या जुन्या जखमावरी ;
तोच दंश करिती आम्हा मनस्ताप देती हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत बसतो माहेरची खुशाली !

तिजोर्‍यित केले हिने बंद जन्म साती,
आम्हावरी संसारची पडे धुळमाती !
आम्ही ते दिवाने, ज्यांना पटली ना साळी !

अशा कुठे कुठे अजून आम्ही गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होत असे घरभेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली आहे टवाळी !

उभा संसार आताच झाला एक बंदीशाला
जेंव्हा साळीचा घाणा बायकोस कळाला !
कशी मेहूणी हि दुर्दैवी अन्‌ बायको भाग्यशाली !

धुमसतात अजुनी हे विझल्या चित्ताचे निखारे !
अजुन स्वप्न जागत उठती उंपट्सुंभ सारे !
आसवेच लग्नानंतर आम्हाला मात्र मिळाली !

 

kavita 16 – Syllybus जरा जास्त आहेच असे

दर वर्षी वाटते…
Chapters पाहून मात्र Passing चा
Problem मनात दाटतो…
जरी lectures चालू राहतात
डोक्यात काहीच घुसत नहीं….
चित्र विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही….

तितक्यातच कुठूनतरी घरचया Function ची
Date जवळ येते…
Semister मधले काही दिवस
नकळत चोरून नेते…

नंतर Extra lecturers घेउन
भरभरा शिकवत राहतात…
Theory Problems Example सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात…

पुन्हा पुन्हा हात चालू लागतात…
मन मात्र चालत नाही….
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच मग बोलत नाही…

Lectures संपून Submission करण्याचा
सुरु होतो पुन्हा खेळ..
मात्र journal Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ…

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी संपुन जातो..
PL मध्ये वाचून सुद्धा
Paper का बर सो…सो च जातो ?????

 

Kavita Sangrah

फिरले रे ग्रह माझें फिरले रे
ओढीने, पैशांच्या, पैशांच्या ओढिने, भुलले रे मन माझे भूलले रे
लेकरे टी.व्हीची आली रे घेउन मागणी माझ्या पुढे
गरीब घराची जाणीव होऊन धावले मन वेडे
या वेडाने, या वेडाने, मागे लाविले शनीचे फेरे
ओढीने, पैशांच्या ओढिने, तुटले रे मन माझे तुटले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे….

विचार सोडुन, मनाशी मोडुन, पैसे ते स्विकारले
पैशांना जागून, सभेत जाउन, प्रश्न देखिल विचारले
त्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेविले होते कॅमेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, मोडले रे घर माझे मोडले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे….

Kavita Marathi

प्रिये तुझ्या आठवणीत :
प्रिये तुझ्या आठवणीत चालत असतांना
मला चार टाके पडले
रक्त वाया ण घालवता
मी त्यानेच प्रेमपत्र रखडले
य सार्यात डॉक्टरने मात्र
चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारच वसूल करणार आहे
पण त्याआधी तुझ्या आठवणीत
मी एक झाड लावणार आहे
तू माझी झालीस कि
त्या झाडाची गोड फळे चखनार आहे
जर तू माझी नाही झालीस तर ते झाड कापूनी मी
माझे चारशे रुपये मिळवणारच आहे
प्रिये तुझ्या आठवणीत
तुला मी प्रेमपत्र लिहणार आहे
त्यासाठी आभाळाचा कागद
अन समुद्राची शाइ करणार आहेच
तुझा नकार असेल तर
मग माझा कागद परत दे
मी त्यावर पाणी तापवणार आहे
प्रिये तुझा नकार मिळ्यावरही
तुझ्या आठवणीची आठवण ठेवणार आहे
थोडा वेळ दुख व्यक्त करणार आणि
मग लगेच दुसरीच्या शोधात निघणार आहेच .

लाग आताच लग्नासाठी मुलगा शोधायला
आपली वाट आपणच शोधायला
हृदयातील दुख हृदयातच दाबायला
चेहऱ्यावर खोत खोत हसू आणायला
नाही जगणार हा एक जन्म माझ्या सोबत
सुदेव म्हण किवा दुर्देव
मग सात जन्माची काय गत

Leave comment